BY - युवा महाराष्ट्र लार्इव्ह – नागपूर
पोलिस खात्यात आपल्या 30 वर्षांचा कार्यकाळात खून, जबरी चोरी, अंमली पदार्थ असे गुन्हे उघडकीस आणणारे व संपुर्ण महाराष्ट्रात गाजलेले गोपाल लोहोबरे हत्याकांडाचा तपास करून आरोपीला न्यायालयातून शिक्षा मिडवून देणारे *पोलिस हवालदार रमाकांत बाविस्कर* यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल सन 2018 करीत राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. बाविस्कर यांनी केलेल्या कामगिरीबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, पोलिस अधीक्षक यांनी प्रशस्ती पत्र देऊन त्यांनी गौरविले. विशेष म्हणजे 2015 मध्ये त्यांना पोलिस महासंचालकांना सन्मान चिन्ह मिळाले आहे. 30 कार्य काळात त्यांना एकूण 157 बक्षिसे वरिष्ठाकडून प्राप्त झाले. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, कडमेश्वर, सावनेर, कुही, या पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी केलेले तपासकार्य महत्वपूर्ण राहिले. त्यांचे लेखनकार्य उत्कृष्ठ असल्याने रायटर म्हणून बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्य केले.
Post a Comment