BY
- सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – अंबरनाथ |
अंबरनाथ तालुक्यातील काकोळे गावाच्या शिवारात असलेल्या काकोले जीआयपीआर
धरणाची संरक्षण भिंत मुसळधार पावसाने फुटली. यामुळे आजूबाजूच्या शहरांना धोका निर्माण
झाला आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीवरच्या जीआयपीआर
धरणाच्या संरक्षक भिंतीला तडे गेले होते. तडे गेल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग होत होता,
हे धरण रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने नागरिकांनी या विषयी रेल्वे
प्रशासनाकडे तक्रार केली होती, मात्र रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.
त्यातच आज धरणाची संरक्षक भिंत फुटली. यामुळे काकोले गावांसह आजूबाजूच्या शहरांना
धोका निर्माण झाला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश
कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे.
त्यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण
आदी शहरांना व 25 लाख रहीवास्याना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.काही दिवसांपूर्वी स्थानिका
नी संरक्षण भिंतीला तडे गेल्याचे वृत्त प्रसारित केले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने
वेळीच दखल न घेतक्याने सध्या आजूबाजूच्या शहरांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हजारो एकर जमिनीवरील भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून, अनेक शेतीचे बांध
फुटले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत असून, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ मध्ये वालधुनी
नदी चे पाणी शीरुन शहरांना मोठा घोका निर्माण
झाला आहे.
Post a comment