0
BY - सरिता केदार नार्इक,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगरात एका बहुमजली इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळून दुर्घटना घडली. अंबिका सागर इमारतीत ही घटना घडली आहे. 
या दुर्घटनेत एका 3 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नीरज सातपुते (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे.अंबिका सागर इमारत ही धोकादायक स्थितीत होती, याबद्दल महापालिकेने इमारतीला नोटीसही बजावल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस, महापालिका अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने धाव घेतली आहे. या दुर्घटनेत इतर दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. 

Post a comment

 
Top