0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

मनसे प्रमुख राज ठाकरे आज तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत. ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे आणि ममता बॅनर्जीं यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. आपल्या निवस्थानावरून राज ठाकरे निघाले आहेत. ममता बॅनर्जीसह ते प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. राज ठाकरेंचा 3 दिवस बंगालमध्ये मुक्काम असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधात टीकास्त्र सोडले होते. यामध्ये राज ठाकरेंनीही आवाज उठवला होता. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली होती. यानंतर आता राज ठाकरेंनी पुन्हा याविरोधात आवाज उठवला आहे. 9 ऑगस्टला ते ईव्हीएमविरोधात मैदानात उतरणार आहेत. दरम्यान यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते ममता बॅनर्जींची भेट घेत आहेत.

Post a comment

 
Top