0
BY - विशेष प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण रेल्वेस्थानकाजवळ रिक्षा चालकांच्या वर्दळीने जाणार्‍या येणार्‍या वाहनांना व बस चालकांना नाहक त्रास होत असताना आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसात मनाप्रमाणे रिक्षा चालकांनी प्रवाशांची लयलूट केली आहे.नेहमीप्रमाणे प्रवाशी दर न आकारता तिप्पटीने मनमानीप्रमाणे प्रवाशांना लुबाडण्यात आले आहे.आज संपुर्ण ठाणे जिल्हयात पावसाचा जोर कायम असताना कल्याण मध्ये रिक्षा चालकांनी जवळच्या नजीक गावाकडे जाण्यासाठी 30 रूपयावरून 50 ते 60 रूपये इतके जादा रक्कम वाढविल्याने नागरिकांनी काही रिक्षा चालकांना चांगलाच जाब विचारून जोरदार पावसाच्या बहाण्याने आमची लूट थांबवा अशा संतप्त शब्दात सुनावले असता रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणाने आणि बसायचे तर बसा नाही तर निघा अशा परखड मुजोरीने नागरिकांची गोची केली.
युनियम अध्यक्षांनी आजच दुर्लक्ष करत मुजोरी रिक्षाचालकांना आपला पाठिंबा दिला.त्याचबरोबर आर.टी.ओ नियमांना धाब्यावर मारून रिक्षा चालकांनी आज नागरिकांची लयलूट करत चांगला डल्ला मारून आपली खिसे भरणी केली आहे.रेल्वे रूळावर पाणी साचल्याने रेल्वेचे वेळापत्रकात बदल झाला तर काही ठिकाणी रेल्वे अडकल्याने नागरिकांची स्थानकातच कुतूंब गर्दी झाली नाइलाजाने काही प्रवाशांना घरचा रस्ता धरावा लागला आहे.तर काही प्रवाशी कामावरून घरी परतत असताना रिक्षा चालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागला आहे.त्यावेळी प्रशासनाचे आपत्कालीन यंत्रणा व सुविधा उपलब्ध नसल्याने त्याचा फायदा रिक्षा चालकांनी घेतला परंतु त्रास मात्र प्रवाशी नागरिकांना झाला.पावसाळयात ज्या रिक्षा चालकांनी प्रवाशांना मदतीचा हात द्दयायचे होते त्याठिकाणी लयलूट झाली ही दुर्देवी बाब आहे.नागरिकांची लयलुट बंद करावी आणि याकडे आर.टी.ओ नी तसेच प्रशासनानी लक्ष वेधून जादा कर आकारून मुजोरगिरी भाषा वापरणार्‍या रिक्षा चालकांची परवाने रद्द करावीत अशी मागणी प्रवाशी नागरिकांनी केली आहे.

------------------------------------------------------
आपत्कालीन यंत्रणा प्रशासनानी सर्वीकडे सज्ज करायला हवी जेणेकरून रिक्षा चालकांची मुजोरी आणि लयलूट तरी थांबवता येर्इल.जे जे रिक्षाचालक जादा रक्कम आकारून नागरिकांच्या खिशाला जाप बसवत आहेत त्या रिक्षाचालकांवर आर.टी.ओ व संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवार्इ करून त्यांचे परवाने रद्द करावे - श्री.सागर दळवी (प्रवाशी)
------------------------------------------------------

Post a comment

 
Top