0
BY - मयूर जाधव,युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर |
लोकशाहीर अण्णाभाऊ  जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ  व जयंती निमित्त क्रांतीगुरू लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठाण कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्दयमाने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजसेवा करून कार्य करणार्‍या मान्यवरांचा गुणगौरव सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ सोहळयाचे उद्दया 1 ऑगस्ट 2019 रोजी शाहू स्मारक,दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी संध्याकाळी ठिक 5.30 वा आयोजन करण्यात आले आहे.
 लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठाण कोल्हापूर नेहमी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सन्मान करून समाजासाठी आणि गोरगरिबांसाठी अमुल्य असे योगदान देऊन एकनिष्ठेची व आपुलकीची साथ देणार्‍या त्या हिर्‍यांना गौरवितात.अशा प्रतिष्ठाणात सर्व जातीचे बहुजन,परिवर्तनवादी,सर्व समाज,विविध पक्ष,संघटना व अन्य अशा एकतेचे प्रतिक असलेल्या बलाढय म्हणून क्रांतीगुरू लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठाणात सामील आहेत.नेहमी दुसर्‍यांच्या सुखात सगळेच असतात  दुखःत जो आला तोच खरा माणूस आणि तीच खरी आपुलकी अशा भावना जोपासून क्रांतीगुरू लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठाणने महाराष्ट्राच्या त्या मान्यवरांच्या कार्याची कार्यशीलता पाहून त्यांना यंदाच्या 2019 पुरस्काराचे मानकरी म्हणून घोषित केले आहे.यामध्ये ठाणे जिल्हयाच्या मुरबाड तालुक्यातील नेहमी निर्भिड लेखणी करून शासनाला गोरगरिबांच्या समस्यांवर दखल घेउन पारदर्शक कारभार करणाची लेखणी  अग्रलेखाचे बादशाहा ज्येष्ठ पत्रकार श्री.नामदेव शेलार व महिलांच्या समस्या थेट मुख्यमंञ्यांना निवेदन देऊन तात्काळ लक्ष घालण्याची गंभीर दखल दाखवून देऊन आदिवासी महिलांना त्यांचे व्यासपिठ निर्माण करून देणारे आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभाक्षेत्र विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांची निवड करण्यात आली आहे.नेहमी नागरिकांच्या सेवेसी तत्पर राहून माणूसकी धर्म  शेलार परिवारांची संस्कृती आदरणीयच आहे अशा प्रतिक्रिया क्रांतीगुरू लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री.अक्षय साळवी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केल्या. क्रांतीगुरू लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठाणमध्ये सस्थापक अक्षय साळवी,अध्यक्ष बाळसाहेब साळवी,व अन्य पदाधिकारी यांची मेहनत माणूसकीची नैतिकता टिकून ठेवणारी आहे. क्रांतीगुरू लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठाणला जनता संघर्ष दलाचे संतोष आठवले,परिवर्तन फाऊंडेशनचे अमोल  यांची साथ महत्वपुर्ण मिळत असून उद्दया होणार्‍या पुरस्कार सोहळयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

Post a comment

 
Top