0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |

मतदारसंघाचा विकास आणि माझे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मी भाजपात जातोय, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. शिवेंद्रराजेंनी मंगळवारी दुपारी आमदारकीचा राजीनामा दिलाय. बुधवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. भाजपात जाण्यामागचं कारण सांगत, राष्ट्रवादीची सत्ता येण्याची कोणतीही शक्यता नाही, असंही ते म्हणाले.राजीनामा देऊन साताऱ्यात गेल्यानंतर शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, माझं अस्तित्व टिकवणं मला गरजेचे होतं. उद्या मी पडलो असतो तर माझी राजकीय कारकीर्द संपली असती. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही. भविष्यात भाजपचीच सत्ता येणार आहे, असा विश्वास शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केला.

Post a comment

 
Top