0
BY - राजु हालोर,युवा महाराष्ट्र लाइव – उडाणे,धुळे |

शहरातील शहीद अब्दुल हमीद नगरातील दोन गरजू महीला श्रीमती नजमबी शेख व श्रीमती पठाण यांना आम्ही धुळेकरच्या माध्यमातून पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत गँस सिलेंडर व गँस शेगडीचे आम्ही धुळेकर संघटना प्रमुख धनंजय गाळणकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.सदरच्या उपक्रमासाठी सलमान शाह व अकील शाह यांनी मेहनत घेतली.तसेच भविष्यात देखील शंभर गरजू माता भगिणींना उज्वला योजने अंतर्गत गँस सिलेंडर व गँस शेगडीचे आम्ही धुळेकरच्या माध्यमातून वाटप करू असे सलमान शाह यांनी सदरच्या गँस कनेक्शन वितरीत कार्यक्रमात नमुद केले.याप्रसंगी आण्णासाहेब कणसे,डॉ.श्रीकृष्ण बेडसे,हर्षल शिनकर,इम्रान शेख,किशोर बोरसे,कमलेशआण्णा गायकवाड,फौजी दिपक मोरानिस,फौजी भुषण पाटील,फौजी प्रविण झोळेकर,पारसदादा देवपुकर आदी पदाधीकारी व मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

 
Top