0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पोलादपूर |

पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडपण येथे पर्यटकांची रीघ लागलेली असते. मूळ कुडपणचे रहिवासी व सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले राजेंद्र शेलार हे मुंबईहून आपल्या गावी नेहमी पर्यटकांना घेऊन येत असत. शनिवारी दुपारीही ते पर्यटकांना घेऊ आले होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता.यावेळी आपल्या सोबत आलेले पर्यटक पाण्यात वाहून जाताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी राजेंद्र यांनी धाव घेतली. पर्यटकांना वाचवताना पाय घसरून ते नदीत पडले व पाण्याच्या भयंकर प्रवाहात वाहून गेले. कुडपण पुलाखाली एक दगडाला ते अडकले. परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहात आदळत-आपटत गेल्याने त्यांचा जीव गेला.

Post a comment

 
Top