BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण-डोंबिवलीमध्ये आज पहाटेपासून पुन्हा एकदा
मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग तीन तास कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण-डोंबिवलीमधील सखल
भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण कोर्टात गुडघाभर
पाणी साचले आहे. तर कल्याण स्टेशननजीक असलेल्या लोहमार्ग पोलीस ठाण्यातही पाणी
शिरले. येथील पोलीस कोठडीत पाणी शिरल्याने कैद्यांना पोलीस ठाण्याच्या
पहिल्या माळ्यावर ठेवण्यात आले आहे. पोलिसांना मात्र या पाण्यातून मार्ग काढत काम
करावे लागत आहे. पाणी साचल्याने पोलिसांनी चांगलीच तारांबळ उडाली होती.तथापि,
पुढचे दोन दिवस मुंबई विभागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली
आहे.
Post a comment