0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
     गेले 6 दिवस मुसळदार पावसाच्या पाण्याखाली वाहुन गेलेले घरातील आदिवासी विधवा महिलेचे कुटूंबाला अद्दयापही सरकारची मदत मिळाली नाही.
     पुराचे पाणी रात्री घरात घुसले त्यावेळी आपल्या लहान मुलांसह विधवा महिला बारकूबार्इ गोपाळ वाघ हिने छातीभर पाण्यातून मुलांना वाचवले त्यावेळी अम्गावरील कपडेच फक्त राहिले,बाकी सर्व सामान,शालेय पुस्तके,सर्वच वाहुन गेल्याने बारकुबार्इ वाघ यांच कुटूंब गावाच्या रस्त्यावरील झाडाखाली बसले होते.
     सदरच्या घटनेचे वृत्त आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभा क्षेत्र विकासमंच ट्रस्टच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार व त्यांच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी बारकुबार्इ वाघ यांच्या कुटूंबाला नाष्टापाणी,अन्न,कपडे यांची व्यवस्था करून मुरबाड महसुल विभागाशी संपर्क साधला.तात्काळ तलाठी शिंदे तात्या,पोलिस पाटील समवेत आले,पंचनामा केला.परंतू अद्दयाप त्यांना काहीही मदत मिळाली नाही.या आदिवासी कुटूंबाला सरकार मदत करणार केव्हा ? की लोकांनी करायची हे शासकीय अधिकार्‍यांनी अद्दयाप ठरवलेले नाही.
     बारकुबार्इ गोपाळ वाघ यांचे संपुर्ण घरच वाहुन गेल्याने त्यांना शासनाकडून तातडीने मदत देणे गरजेचे होते मात्र,शासनाचा निधी नाही,रेशनिंग धान्य देता येणार नाही,अशी उत्तरे महसुल अधिकारी देत असल्याने सत्ताधारी नेत्यांनी भरपार्इची आश्‍वासने देवू नयेत.













Post a Comment

 
Top