BY -
युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी
आणि कॉंग्रेसच्या 162 आमदारांची परेड ग्रँड हयात हॉटेलमध्ये घेण्यात येत आहे. शिवसेनेच्या
आमदारांसह 2 बस हॉटेल ग्रँड हयात पोहोचल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि
सुप्रिया सुळेही ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहोचल्या आहेत. कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन
खर्गे आणि चरणसिंग सप्रा हे हॉटेल ग्रँड हयात येथे आहेत.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हेदेखील
हॉटेल ग्रँड हयात येथे पोहोचले आहेत. या हॉटेलमध्ये सेनेचे 56 आमदार आधीच उपस्थित आहेत.
हयात हॉटेलमध्ये आमदार आपापल्या जागेवर बसले आहेत. कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे हे ग्रँड हयात येथे उपस्थित आहेत.
Post a comment