0
BY - गौरव शेलार , युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
भाजपा सरकारच्या पाच वर्षीय कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाहुनचारासाठी कोटी रूपयाची उधळपट्टी करणार्‍या तसेच तात्काळीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांच्या दुर्लक्षतेने हजारो कोटीची निकृष्ट कामे कामे न करता बिले काढण्याचा ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षिक अभियंता नाना पवार आर.टी.पाटील कार्यकारी अभियंता प्रदीप दळवी परदेशी यांना निलंबित करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण अनंत पाटेकर व त्यांच्या सहकार्‍यानी सुरू केले आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे कार्यालयात लागलेल्या आगीची चौकशी भाजपा सरकारने दडपल्याने ठाणे पालघर जिल्हयातील हजारो कोटी रूपायाचा रस्ते इमारती अन्य कामाचा निधी घोटाळा दडपल्याचा आर.टी.आय समाजसेवक अनंत पाटेकर व त्यांच्या सहकार्‍याचा संशय आहे.आग कसी लागली की लावली गेली तसेच त्या आगीत कोणते टेंडर एमबी रजिस्टर मुल्यांकन बिले अन्य कागदपत्र किती जळाले त्यांच्या नोंदीची माहिती उघड झालेली नाही माहिती अधिकार कायदयातर्गत माहिती दिली जात नाही .शासनाच्या विविध हेडमधुन आलेला निधी हाडप करण्याचा प्रताप या अधिका-यानी केला आहे.त्याची चौकशी करून त्यांना निलंबीत करावे अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.मुरबाड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या पाच वर्षात एक हजार कोटीच्यावर निधी खर्च केल्याचे दाखवले असताना प्रत्येक्षात कामे झालेली नाहीत ठाणे जिल्हयात तसेच पालघर जिल्हयात 50 हजार कोटीच्यावर कामे गेल्या पाच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनलहायवे सा.बा.विभागाने केली असल्याची माहिती समोर येत असुन ऑफलार्इन टेंडर करून अधिक्षिक अभियंता कार्यकारी अभियंता दळवी तसेच टेंडर क्लार्क यांनी कोटी रूपये कमविले आहेत.तसेच ऑनलार्इन टेंडर ओपन करताना एका टेंडर मागे 15 हजार ते 1 लाख रूपये तसेच बिले काढताना एक ते दोन टक्के रक्कम कार्यकारी अधिकार्‍यापासुन बिले बनवणारे तपासणीक आकाऊन्टर घेत आहेत असे वर्षात ठाणे जिल्हयात दोन हजाराच्यावर टेंडर होत असल्याने हजारो कोटी रूपये कार्यकारी अभियंता टेंडर क्लार्क त्याचे सहकारी कमवित आहेत.निधी देण्यासाठी टक्केवारी दयावी लागते अशा भ्रष्टाचारावर आजपर्यंत चालत असलेले राजकारण स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी रूपवावे गेल्या 10 वर्षातील कामाची चौकशी करावी अधिकार्‍याना तात्काळ निलंबीत करावे अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.  
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
(पुढील भागात जीएसटी निधी अपुर्ण कामापोटी ठेवलेला निधी कुठे गेला बिल कटींग डिपॉजिट निधीचा पोलखोल आवश्य वाचा)

Post a comment

 
Top