0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
शासकीय विश्रामगृहात पत्रकारांची मिटींग आयोजित केली असता आल्टे नामक शाखाअभियंता यांनी आपल्या मनमानीने सदर मिटींग घेण्यास हरकत घेऊन शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांना येण्यास बंदी घातली असल्याचा प्रकार आज मुरबाड येथिल शासकीय विश्रामगृहात घडला आहे यासंबंधी सर्व पत्रकारांनी जाहिर निषेध केला आहे.या शासकीय विश्रामगृहात आल्टे ठेकेदारांना रात्रभर बसवितात.याच शासकीय विश्रामगृहात रात्रीच्या पारी दार बंद करून दारू,मटणाच्या पाटर्या चालतात.आल्टे येथेच ठेकेदार, शासकीय अधिकारी घेऊन बसतात,तेव्हा चालतो परंतू लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार जेव्हा मिटींग घेण्यास येतात तेव्हा पत्रकारांसाठी हा विश्रामगृह नसल्याचे सांगून पत्रकारांना बंदी घालतात मग राजकीय नेते तसेच अधिकारी यांना बंदी नाही आणि पत्रकारांना बंदी हा भेदभाव आणि मनमानी प्रकार थांबला पाहिजे या निषेधार्थ सर्व पत्रकारांनी शासकीय विश्रामगृहासमोर आल्टे यांचे विरोधात निषेध व्यक्त केला आहे.जसे आम्हाला येथे येण्यास बंदी घातली तसेच येथे राजकरण करणार्‍याला,ठेकेदार,अधिकार्‍यालाही या ठिकाणी येण्यास बंदी घालावी तसे निदर्शनास आल्यास आम्ही टाळे ठोकून जनआंदोलन करू असा इशाराही यावेळी पत्रकारांनी दिला आहे.याच शासकीय विश्रामगृहाच्या व आल्टे यांच्या मनमानी आणि भ्रष्ट अधिकार्‍या विरोधात पत्रकार संस्था,सामाजिक संघटना,आदिवासी संघटना आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.दर दिवशी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी शासकीय विश्रामगृहाच्या मनमानी कारनाम्याला रोखण्यासाठी आंदोलन करित प्रवेश करणार असल्याचे आमच्याशी बोलतांना सांगितले.सार्वजनिक हॉल आहे तेथे सगळयांना प्रवेश मिळाला पाहिजे आणि जर तसेच नसेल येथे येनार्‍या ठेकेदाराला,अधिकार्‍याला,आमदार,खासदार,मंञ्यांनाही येथे प्रवेश दिला गेला नाही पाहिजे कारण नियम हा सर्वांसाठी सारखा पाहिजे.पत्रकारांच्या महत्वपुर्ण मिटींगा असल्या तर त्यांना बसुन दिले जात नाही परंतू ठेकेदारांना,अधिकार्‍यांना पाटर्या करण्यास कशी परवानगी दिली जाते याचे उत्तर उग्रटी आल्टे यांनी पत्रकारांना द्दयाव्यात असा सवाल केला जात आहे.उग्रटी आल्टे यांचे ताब्यात विश्रामगृह असताना अधिकारी,कर्मचारी यांनी दारूच्या पाटर्या,जुगार याच विश्रामगृहाचा अड्डा बनवला आहे.याकडे लक्ष वेधून मुख्यमंञ्यांनी आल्टे यांचेवर कारवार्इ करावी अशी मागणी येथिल पत्रकार,सामाजिक संघटनेनी मागणी केली आहे.या विषया पाठपुरावा करून सर्वांनाच बंदी घाला,जो नियम आम्हाला सांगण्यात आला तो सर्वांनाच जाहिर करा,ठेकेदारांच्या गाडयांनाही शासकीय विश्रामगृहात प्रवेश करून देऊ नये अशी मागणी मुख्यमंञ्यांकडे पत्रकारांनी करून सार्वजनिक बांधकाम आवाराचे व विश्रामगृहात फलक लावून काय नियम आहेत ते जाहिर करावेत तसेच या विश्रामगृहात लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेराचे चे रेकॉर्ड चित्रण दर आठवडयाला मुख्यमंञ्यांनी आपल्याकडे मागविण्याचे अवगत करावे अशीही मागणी यावेळी पत्रकार,सामाजिक संघटनेनी केली आहे.

Post a comment

 
Top