0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
नववर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमधील नौशेरा विभागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र नाईक संदीप सावंत यांच्यासह दोन जवानांना वीरमरण आले. ते सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवासी होत. 25 वर्षीय संदीप यांच्यामागे पत्नी सविता या आहेत. संदीप सावंत हे सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी होते. मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत नौशेरा (जम्मू सेक्टर) येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले.11 ऑक्टोंबर 1990 रोजी जन्मलेले संदीप सावंत हे 28 सप्टेंबर 2011 रोजी सैन्यात भरती झाले होते. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून 18 मराठा बटालियनमध्ये समाविष्ट असलेल्या संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगी आहे. तसेच आई - वडील, चुलते, चुलत भाऊ, बहिण असा त्यांचा परिवार आहे. ववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील अन्य सहकारी तात्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या कळू शकत नव्हती. त्यामुळे नाईक संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. त्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ते व नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.

Post a comment

 
Top
satta king