0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर ठाणे जिल्हयाच्या मुरबाड तालुक्यात टपरीवरील बनावटी  गुटखा हा विक्री केला जात होता परंतू अलीकडे दोन नंबरी गुटखा संपल्याने प्रयत्न करूनही अम्ल प्राषण करणार्‍या युवकांना व नागरिकांना मिळत नाही.काही ठिकाणी तर बनावटी मिराज आणून दोन नंबरी धंदा केला जात असल्याची चर्चा आता सकाळच्या 7 ते 11 वेळेत येणार्‍या नागरिकांतून मिळाली आहे.एवढेच नाही तर त्या चोघांचा गुटखा विक्रेता म्होरक्या आता दुधाच्या व्यवसायावर आला आहे.चांगल्या मार्गाने धंदा दाखविणार्‍या त्या गुटखा डिलरचा म्होरक्या बनावटी थंडपेय व बिस्लरी बनवून नागरिकांची फसवणूक करत आहे.हा गैरधंदा गणेशनगर,मातानगर रस्त्यालगत असल्याचे वृत्त आहे. बनावट गुटखा असो की थंडपेय व बिस्लरी यात महाशूर ठरलेला तो डिलर दुधाच्या धंद्दयाआड आता बनावटी पेय बनवून शासनाचे कर बुडवित आहे.बिस्लरी पाणी व थंडपेयाचे कंपनी लेबल बनावट लावून गैरधंदा केला जात आहे.औषध अन्न भेसळ अधिकारी यांनी मुरबाड तालुक्यातील सर्व थंडपेय बिस्लरी व्यवसायक,कंपनी यांची चौकशी गोपिनीय पथक  नेमून करून कारवार्इ करावी व त्यांचे परवाना रद्द करावे अशी मागणी केंद्रीय पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नामदेव  शेलार यांनी मुख्यमंत्री,औषध अन्न भेसळ मंत्री,जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडे केली आहे.


Post a comment

 
Top