BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
नागाचा खडक मुरबाड येथे पत्रकार महिलेचे घर असून त्याच जागी
कार्यालय आहे.त्यांच्या स्वतःच्या खाजगी जागेतुन गावगुंन्ड नगरसेवक विकास वारघडे (भाजपा)यांच्या
समर्थकाला वाहने जाण्यास मनार्इ केल्याने भाजपा गुंन्ड नगरसेवक विकास वारघडे यानी रस्ता
न दिल्यास तुमचा रस्ता बंद करून बघुन घेवू अशी गावगुंन्डा प्रमाणे धमकी दिली आहे.सदर प्रकरणी मुरबाड पोलिस
ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गावगुंन्डगिरी करणार्या विकास वारघडे याच्यावर
पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा पुढील अनुसुचित प्रकार घडल्यास
त्यास पोलिस जबाबदार राहतील असा इशारा केन्द्रीय पत्रकार संघ ठाणे जिल्हा यांनी दिला
आहे.पत्रकारांना धमकावणे,गावगुंन्ड राजकारण्यांना सोपं झालं आहे.सरकार अशा गावगुंन्डावर
तात्काळ कारवार्इ करत नसल्याने पत्रकारांना जाहिर निषेध करावा लागतो मात्र,पत्रकार
एक माणूस आहे.किती वेदना सहन करणार राजकीय आश्रयाने गुंन्डगिरी वाढली आहे.पदाधिकार्यांचे
समर्थक आमदार,खासदार,मंत्री त्यांचीच बाजू घेतात त्यामुळे निर्भिड पत्रकार,सामान्य
माणसावर अन्याय होत आहे.अशा गावगुंन्डगिरी करणार्या पदाधिकारी असो की नगरसेवक यांना
धडा शिकवण्यासाठी वरिष्ठ नेत्यानी चाप दयावा. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारावरील हल्ल्याला सरकारला जबाबदार धरले आहे.मात्र
त्यांच्याच भाजपा पक्षाचा मुरबाड नगरपंचायतीचा गावगुंन्ड नगरसेवक विकास वारघडे पत्रकारांना
धमकावत आहे.त्यांचा बंदोबस्त करून न्याय दयावा अन्यथा पत्रकार आंदोलन करतील तसेच पत्रकारांवर
हल्ला झाल्यास पत्रकारांच्या बचावास पत्रकारांनी निषेधा पुरते मर्यादित न राहता आपल्या
बचावासाठी या पुढे शासनाची परवानगी लागेल असे पत्रकार संघटनेने मत व्यक्त करून गावगुंन्ड
भाजपा नगरसेवकाचा जाहिर निषेध करून महिला पत्रकार त्याला चांगलाच धडा शिकवतील असा इशारा
दिला आहे.सदरची तक्रार मुख्यमंत्री गृहमंत्री पोलिस महासंचालक ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षिक
यांच्याकडे केली असून महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनेनी निषेध करून पुढील दिशा
ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.
Post a comment