0

BY - विशेष प्रतिनिधी ,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुरबाड नगरपंचायतीचे भाजपा नगरसेवक विकास वारघडे यांनी गावगुंन्डगिरी करत पत्रकाराला धमकावले आहे.त्यासंबंधी मुख्यमंत्री,पोलिस महासंचालक,ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षीक यांचे कडे तक्रार करण्यात आली होती.पत्रकार संघटनांनी नषेध करून कारवाची मागणी केली  होती तर महिला पत्रकार आक्रमक झाल्या होत्या.यांची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले असून ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षीक यांनी कारवाचे आदेश दिल्याने पत्रकार व पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे आभार मानले असून ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षीकांचे आभार मानले आहेत.
          पत्रकारांच्या बाबतीत तात्काळ दखल घेऊन कारवा करा.पत्रकारावरील हल्ले धमक्या सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे.त्यासाठी आम्हाला पत्रकारांच्या सुरक्षासाठी  रस्त्यावर यावे लागेल असा इशारा देवून अनेक सामाजिक संघटनांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकारांना पाठिंबा व्यक्त केला आहे.


Post a comment

 
Top