0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी ऊभा असतो. त्यात कोरोना साथरोगाच्या काळात ही पत्रकार संघाने महाराष्ट्र भर स्तुत्य उपक्रम राबवले.कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोगाचा धोका पत्करुन पत्रकार ,वार्ताहर अचूक वार्तांकन करत आहेत.हाच मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात राज्य पत्रकार संघाचे मार्गदर्शक संघटक संजयजी भोकरे यांनी पञकारांना एक कोटी विमा कवच जाहीर करण्याची मागणी सरकार कडे केली होती. तसेच पोलीस , डॉक्टर,आरोग्य सेवक हे कोरोनायोध्दा आहेत तसेच पत्रकार हा सुध्दा कोरोना योध्दा असून शासनाने दुर्लक्ष करु नये असे वारंवार म्हटले होते.
महाराष्ट्रातील सर्वच विभागातील पञकार बांधवांकडून तसेच पत्रकार संघाकडून विमा संरक्षण तसेच पॅकेज ची मागणी करण्यात आली होती.अशातच आज आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी कोरोना काळात कर्तव्यावर असणारा पत्रकार मृत्यूमुखी पडला तर त्यास पन्नास लाखाचे विमा कवच मिळणार असल्याचे स्पष्ट केले.मात्र त्या पञकारास संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकार्याने पत्रकार असल्याचे पञ द्यावे लागणार.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने शासनाकडे पॅकेज सह अनेक योजना, सवलती, विमा कवच याची मागणी जोर लावून धरलेली आहे .त्यातील पत्रकारांना पन्नास लाखाचे विमा कवच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे पत्रकार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे . पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , कार्यध्यक्ष राकेश टोळ्ये ,किरण जोशी ,प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ देशकर ,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ,प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनीआरोग्य मंञी राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.


Post a comment

 
Top