0

BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड (सत्य अग्रलेख) |
अनेक सालापासून आपण पाहत आलोय अनेक साहेब झाले,अनेक समर्थक यांनी साहेबांचे गुणगाण गायिले आहेत,परंतू आपला साहेब कधी समाज धरतो,कधी पैसा धरतो,कधी हा पक्ष तो पक्ष धरतो,कधी अवैध धंदेवाल्यांचा पार्टनर होतो,कधी टक्केवारीचा मानधनी होतो परंतू यापलीकडे आपण विचार केला तर ते साहेब जेव्हा खोटं बोलतात तेव्हा रेटून बोलतात आणि जनसामान्यांनी या कोरोना पार्श्‍वभुमीवर हे सर्व पाहिले आहे.पहिले तळागळात फिरून बोलबच्चन करणारा साहेब व खंदे समर्थक आता कोरोनामुळे समोर येर्इना आणि टोमनं मारणं तर अधिकच बेहुशारपणाने असते,तरीही त्यामध्ये खोटं रेटून बोलणं आहेच.सत्ता पलटली की माणसाची वृत्ती बदलते मग तो एखाद्दया हुद्दा,पदावर असो वा नसो.नावासाठी ते साहेब खोटं बोलून काय सिध्द करणार आहेत,सुशिक्षीतांच्या नोकर्‍यांसाठी कधी धावपळ झाली नाही,नेहमी ठेकेदारीवाल्यांची व खंदेसमर्थकांसाठी धावपळ असते,त्यात पण मोजकेच नागरिक ज्यांनी निवडणूकीसाठी धावपळ करून घामाच्या धारा घालवल्या त्यांच्यासाठी एक फोन अधिकार्‍यांना केला जातो परंतू त्यांना माणणार्‍या त्या जनसामान्यांचं काय ? नेहमी बघतो,करतो,होऊन जार्इल,पाहून घेतो,सांगतो असे शब्द समोर आले परंतू प्रत्यक्षात ते साहेब कधी समोर त्याच्या गेले नाहीत.अलीकडे तर चॅप्टरगिरी एवढी वाढली की,लोकप्रतिनिधींनी तर कोरोना मध्ये प्रसिध्दीसाठी विविध उपक्रम हाती घेतले.जेव्हा महाराष्ट्राचा आकडा वाढत होता तेव्हा मुरबाड ग्रामीण भागाचा आकडा शुन्य होता आणि आज महाराष्ट्राचा आकडा कमी होत असतांना मुरबाडचा आकडा कसा वाढू लागला यामुळे येथिल नागरिकांनीही विचार केला की,कोरोना आहे की नाही,घरात राहून मरण्यापेक्षा कोरोनानी मेलेले बरे अशी चर्चा सध्या उमटू लागली आहे.अनेक लॉकडाऊन दिवसांचे झाले,घरी कोंबले तरी आकडा वाढला,बाहेर निघालो तरी आकडा वाढला,काही कोरोनातून बरे झाले तरी आकडा वाढला,काहींनी प्रश्‍न विचारले की,आहो साहेब कोरोनावर उपचार,लस नाही तर कोरोना रूग्ण बरे कसे होतात ? अशा गंभीर आणि लक्षपुर्वक विषयाकडे नेमकं साहेबांनी का आता लक्ष वेधू नये,फेकूपना करून आश्‍वासन रेटून का खोटंपणा केलं जातो असा सवाल मात्र जानकारी नागरिक करत आहेत.
          पत्रकार चांगले काम करते त्यांच्यावर शिंतोडे उडवले जाते,अहो साहेब खरे कोरोना योध्दा तर मिडीयाचे पत्रकार आहेत,तुम्ही तरी फिरत नाहीत परंतू जे पत्रकार घडामोडीचा आढावा घेऊन सर्वसामान्यांनपर्यंत बातमी स्वरूप पोहोचवितात त्यांच्यासाठी काही करता येत नाही तर निदान चौथा स्तंभाची लाज तर राखा.जे लिहतो ते सत्य मग चिडचिड कशासाठी ? पत्रकारांसाठी करायचं सोडून त्यांना वार्इट बोलणं सोडा आता.आयुष्यभर ज्या पत्रकारांनी सर्वसामान्यांच्या अन्याय हक्कासाठी झडून न्याय मिळवून दिला अशा पत्रकारांच्या समाजसेवीकार्याचा चांगलेच पांग फेडायला लागले.पत्रकारांना कोण्या शहान्यांनी पत्रकारिता शिकवू नये अन्यथा टक्केवारीचा सुर आणि मागील इतिहासाचा लेखाजोखा समोर येण्यास वेळही लागणार नाही तेव्हा झाकलेली मुठ लाखाची खोलली जार्इल तेव्हा खाकाची वजाबाकी होण्यास काही वेळ लागणार नाही हे निशिचतच.कालपर्यंत ज्यांच्या विरोधात होतात आज त्याच्या सोबत मांडीला मांडी आहे आणि लोकांसमोर विरोधी म्हणून देखावपणा कशाला ? इतिहास साक्षीला आहे की,जो चितला तो मातला आणि याचेच देणं नशीबाणं पदरात घातल्यासारखं वाटत आहे.खोटं बोलून आज वाचाल परंतू चोरावर मोर हा असतोच आणि चुकीच्या गोष्टी जास्तकाळ चालत नाहीत.़पहिले काळाबाजार थांबवा,बसवलेले प्रशासकांना मार्गदर्शन करा,हप्तेखोरांविरोधात कारवार्इ करा,अहो साधी मासिक लोकांच्या समस्यांची सभा घेऊन त्यांच्या समस्यांना 12 तासात निराकरण उत्तर द्दया तेव्हा जनता तुम्हाला मानेल कारण गेले ते दिवस.आकाशात उडणारा एक दिवस तरी जमीनीवर येतो हा इतिहास आहे जो नशिबासारखं आहे कधी बदलेल सांगता येणार नाही.म्हणून खोटं बोलतांना रेटून बोला कि निदान पत्रकारांना त्याच्यावर विश्‍वास बसेल.एकटा जीव आणि सदाशिव गत होऊन राहिला असतानाही दुसर्‍याकडे बोट दाखविणे अजून गेले नाही.ज्यांनी तुमच्यासाठी केले त्यांना जवळ न घेता शेबंडयांना जवळ घेऊन शिखरावर पोहोचविता त्यातच स्वतःच्या खिशात कधी हात गेला नाही आणि दुसर्‍याला सांगितले तर तो कधी करणार नाही मग यात मोठा कोण ? म्हणून खंदेसमर्थकींनी साहेबांचे गुणगाण गायिले की,टेंडर निघाले मोठया रक्कमेचे,अरे समर्थका आज साहेब आहे म्हणून ठिक उद्दया दुसरा साहेब आला तर तळयात मळयात होणारच ना,आणि कालपर्यंत त्या साहेबांच्या जोडिला असणारे आज या साहेबांच्या जोडिला त्यात काय बदल झाला.बदल तर एकच गोष्टीचा झाला तो म्हणजे पक्ष आणि सत्ता त्यापलीकडे काहीच दिसेना म्हणून साहेबांच्या जीवावर जगणं सोडा आणि स्वतःचे वैभव उभे करा.


Post a Comment

 
Top