BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
गेल्या पाच वर्षात
सरकार मंत्री लोकप्रतिनिधी नोकर्यांच्या पाठीमागे धावण्यापेक्षा छोटे छोटे उद्दयोगधंदे
करा त्यांच्या पाठीला पाठ लावुन काँगे्रस राष्ट्रवादी शिवसेना अन्य लोकही उद्दयोगात
पडा तरूणानों,नोकरीच्या मागे धावू नका असे मार्गदर्शन करत होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव
कोरोनात आला आहे.उद्दयोगात पडण्याच्या मार्गदर्शनाने
लाखो तरूणांनी छोटे छोटे धंदे व्यवसाय सुरू केले.वडापाव पासून रिक्षा,टेम्पो,बस,कालीपीली
जिप,टॅक्सी,टमटम,मोबार्इल दुकाने,केस कर्तनालय खानावळ,हॉटेल व्यवसाय,ढाबे,हार्डवेअर,कपडा
दुकान अशा छोटया छोटया व्यवसायाकडे बँक,खाजगी सावकार,सोसायटया मधून कर्ज घेऊन वळले
मात्र याच उद्दयोग व्यवसायिकांना केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारनी बेरोजगार बनवले आता
त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्यांनी बेरोजगार पोर्टल आणले आहे.नोकर्या आणल्या आहेत.तत्णांना
स्वातंत्र व्यवसायातून नोकरभरतीच्या दलदलीत आणल्याने बेरोजगारावर मोठे संकट उभे राहिले
आहे.
सरकारची हुकूमशाही
चालली आहे.नगरपंचायतपासून महानगरपालिका,ग्रामपंचायत मनमानी आदेश काढतात,घरात कोंबून
ठेवतात,किराणा दुकानदारांपासून रात्रीचे दवाखाने सुध्दा बंदे करतात,खाजगी रूग्णालयात
रूग्णांना घेऊ नका,सरकारी मध्ये पाठवा असा फतवा काढला जातो.रूग्ण तपासणी फीस लोकांना
परवडत नाही मात्र,सरकार काहीच देण्यास तयार नाही उलट सरकारच्या म्हणण्याप्रमाणे वागा
नाहीतर गुन्हे दाखल करू असा दम देतात यावर आता लोकशाहीत नियंत्रण आणि दबाव टाकणारा
कोणताही पक्ष नेता राहिला नाही.
लॉकडाऊन करून
कोरोना अधिक वाढला.जेवढा खुल्या बाजारात वाढला नव्हता म्हणजे खरा कोरोना कोणता त्यावर
निदान झाले नाही.मात्र,कोरोना कालावधीत प्रचंड महागार्इ वाढली,भुकबळी वाढत चालविला,रूग्ण
वाढत चालले त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणेत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे.गरिबांच धान्य हजारो टन काळयाबाजारात विकलं,तहसिलदार,नगरपंचायत,रूग्णालय
कोव्हीड सेंटरला आलेला निधी यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे.मात्र,त्याची चौकशी करून कारवार्इ
करण्यापेक्षा लोकांना बंधिस्त केले.मोर्चे,आंदोलने
होऊ नये माहिती मागू नये म्हणुन कार्यालय बंद केले फक्त कोरोना…कोरोना…
मात्र,कोरोनावर मात करण्यास सरकार दोन्ही
अपयशी ठरले आहेत.सरकारने शिक्षणाचा घो घातला,शालेय
विद्दयार्थी ऑनलार्इनसाठी मोबार्इल लॅपटॉप कोठून आणणार,ऑनलार्इन फीस कोठून भरणार अशा
संपुर्ण गरिबाच्या टाळूवरचे कोणी खाणार्यांना मात्र,खरा कोरोना झाला पाहिजे अशा संतप्त
प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
Post a comment