BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |
कोरोनाच्या साथी मध्ये जीवावर उदार होऊन सतत सहा महिने पत्रकार
आपले कर्तव्य बजावत आहेत यामध्ये काही पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला तर काही पत्रकार
खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले आहेत कोरोना साथी संबंधी लोकांना सातत्याने माहिती
देण्यासाठी सर्व पत्रकार काम करत आहेत त्यामुळे सर्व पत्रकारांना तातडीने 50 लाखाचे
विमा कवच देण्याची मागणी मुरबाड येथील पत्रकारांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना
एस एम एस पाठवून केली आहे
दिवंगत पत्रकारांना 50 लाखांची तातडीने मदत
करावी , ज्या पत्रकारांना कोरोना रोगाची लागण झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे
लागले त्यांचा रूग्णालय व औषध गोळ्यांच्या खर्चाची रक्कम शासनाने द्यावी , प्रत्येक पत्रकाराला 50 लाख रुपयांचे विमा कवच द्यावे
अशी मागणी करण्यात आली आहे विमा कवच देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी व मुरबाड तहसिलदार
यांना निवेदन देऊन ठाणे जिल्हा माहिती अधिकारी व प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार कार्यालय
यांचे मार्फत वर्तमानपत्र व न्युज चॅनलवर काम करणाऱ्या सर्व पत्रकारांची माहिती गोळा
करावी अशीही मागणी करण्यात आली आहे
Post a comment