0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

ठाणे जिल्हा परिषद कृषि विभागाच्या वतीने कृषि , पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांच्या उपस्थितीत शहापूर तालुक्यातील लाहे गावातील शेतकरी काशिनाथ भोईर यांच्या शेतावर भात कापणी यंत्राद्वारे भात पीक कापणी प्रात्याक्षिक करण्यात आले. यावेळी शहापूर पंचायत समिती सभापती रेश्मा मेमाने, उप सभापती जगन पष्टे, पंचायत समिती सदस्य कविता भोईर,  कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, जिल्हा कृषि अधिकारी  डी. बी.घुले, सहाय्यक गट विकास अधिकारी सुशांत पाटील, कृषि अधिकारी पंचायत समिती विलास झुंजारराव, विलास घूले, सचिन गगावणे, सरपंच अशोक भस्मा तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या मार्फत सुधारित कृषि अवजारे योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना यांत्रिक पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहित करून योजनेचा लाभ दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांना भात लावणी, कापणी, पावर टिलर, पावर विडर, गवत कापणी यंत्र, कडबा कुटी, इत्यादी यंत्र ७५ टक्के अनुदानवर शेतकऱ्यांना  दिले जाते. त्यामुळे  जिल्ह्यातील शेतकरी यांत्रिक पद्धतीने शेतीची  कामे करत असून यांमधून त्यांना वेळेची बचत, मजुरी बचत, अल्प मनुष्यबळात शेतीचे कामे होत असून यातून उत्पन्न चांगले मिळत आहे.

Post a comment

 
Top