0
BY,युवा महाराष्ट्र लाईव्हजळगाव

जळगावमध्ये भरधाव वेगात चारचाकीची समोरा-समोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नशिराबादजवळ मध्यरात्री हा अपघात झाला आहे. भरधाव चारचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या भीषण अपघातात जळगाव येथील चौघांचा जागीच दुदैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.नशिराबाद गावाजवळील वळणावर गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद गावाच्या वळणावर आयटेन कार (एम.एच.19 बी.यु.8710) आणि क्रेटा कार (एम.एच.19 सी.यु.6633) मध्ये समोरा-समोर धडक झाली. या भीषण अपघातात आयटेन कारमधील जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील रहिवासी असलेल्या समुद्रगुप्त उर्फ बंटी चंद्रगुप्त सुरवाडे (20, रा.गेंदालाल मिल, जळगाव), दीपक अशोक चव्हाण (22, गेंदालाल मिल, जळगाव), सुबोध मिलिंद नरवाडे (18, गेंदालाल मिल, जळगाव) आणि 18 वर्षीय अनोळखीचा जागीच मृत्यू झाला

Post a Comment

 
Top