0
BY, नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाईव्ह - मंत्रालय
 जिल्हा अधिकारी ठाणे कार्यालय येथे महसूल दिनी सेमिनार आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाणे जिल्हयातील तहसिलदार,महसूल अधिकारी व कर्मचारी जे दक्ष आणि कतृत्वान म्हणून आपली भुमिका बजावतात अशा अधिकार्‍यांचा सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र दिल्याने शासकीय कार्यक्रम महसूल दिनी साजरा करण्यात आला.
यावेळी तहसिलदार विजय तळेकर,मुरबाडचे प्रशासकीय अधिकारी नायब तहसिलदार हनुमंत जगताप यांचा सत्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.ठाणे जिल्हयातील उत्कृष्ट कामगिरी करत असून शासकीय कामातुन सर्वसामान्य जनतेची कामे आणि शासनाला कुटूंबापेक्षा जास्त वेळ दिला जात आहे ही मोठया धेर्याची आणि अभिमानस्पद गोष्ट आहे.
अशा अधिकार्‍यांचा शासनाने सत्कार केल्याने महसूल अधिकार्‍यांमध्ये पुढिल कामकाजाबद्दलच्या नव्या उमेदचा ज्योत नक्की प्रकाशच देणार यात शंका नाही.या महसूल दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी कार्यालयातील गिरीष काळे यांच्या धडाडी कार्याला पाहून त्यांचाही सत्कार यावेळी एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी व्यासपिठावर ठाणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी महेंद्रजी कल्याणकर,तालुक्यातील महसूल विभागाचे सर्व उपविभागीय अधिकारी,वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

 
Top