0
BY - युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुंबर्इ
शासनाने या वर्षी १३ कोटी  वृक्षलागडीची मोहीम हाती घेतली असली तरी या मोहिमेतुन मुरबाड महावितरण ने या मोहिमेत सहभागी होण्यापेक्षा आपल्या आवारात असणारी पुरातन झाडे यंत्राच्या सहाय्याने कत्तल केली असुन मुरबाड नगरपंचायतीने मात्र या प्रकाराला पाठीशी घातले असल्याने वृक्षप्रेमी मध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
      महाराष्ट्र शासन गेली दोन वर्षांपासून कोट्यवधी वृक्षलागवडीची मोहीम राबवत असताना या मोहिमेत इतर शासकीय यंत्रणेला देखील सहभागी होण्याची सक्ती केलेली असताना तालुक्यातील २०७ गावासह शहरी ,औद्योगिक,तसेच ग्रामीण भागात विज पुरवठा करणाऱ्या महावितरण विभागाने मात्र गेल्या दोन वर्षात एकही झाड लावलेले दिसत नसुन आपल्या कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या पुरातन झाडांची कत्तल केली आहे.
       कोणतेही जिवंत झाड तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेणे अत्यावश्यक असताना महावितरण ने शासनाचे नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे जिवंत झाडांची कत्तल केली आहे.मुरबाड महावितरण चे कार्यालय हे मुरबाड नगरपंचायतीचे कार्यक्षेत्रात येत असल्याने  शासनाचे नियमाप्रमाणे नगर पालिका नगरपंचायत यांचा आपल्या आखत्यारित्या वृक्षप्राधिकरण हा स्वतंत्र विभाग असुन त्यांचे मार्फत आपल्या कार्यक्षेत्रातील वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन केले जाते. त्यांचे कडुन महावितरण ने अधिकृत रित्या परवानगी घेणे हे गरजेचे  त्यांची जिवंत झाडांची कत्तल करुन एक प्रकारे जिवित हानी केली असल्याचा संतापजधक प्रकार केला असल्याने मुरबाड नगर पंचायत मात्र या विभागावर कोणतीच कारवाई करत नसुन  त्यांना पाठीशी घालत असल्याने मुरबाड नगर पंचायतीचे कारभारा बाबत नागरिकामध्ये सशय व्यक्त करित आहेत.



Post a Comment

 
Top