0
BY - युवा महाराष्ट्र लार्इव - नवी दिल्ली  -

हिमाचल प्रदेशतील चंबा जिल्ह्यात खासगी बसचा अपघात झाला. बस दरीत पडल्याने बारा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 35 प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी रात्री बस पठाणकोटहून डलहौजीच्या दिशेने निघाली होती. यादरम्यान डलहौजी भागातील बानीखेत येथे ही घटना घडली. डलहौजी पोलीस उपायुक्त यांच्या नेतृत्वात मदत कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

 
Top