0
BY -  युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
पुणे-सोलापूर रोडवर मध्यरात्री कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर इर्टिगा आणि ट्रकमध्ये भीषण अपघातामध्ये 9 तरुणांना जीव गमवावा लागला. अक्षय भरत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकात   वाबळे, सोनू ऊर्फ नूरमहंमद अब्बास द्याया, परवेज अशफाक अतार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकात घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर मुलानी अशी मृतांची नावे आहेत. सर्व जण यवत येथील रहिवासी होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या इर्टिगा या चारचाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. ही एवढी जोरात धडक होती की चारचाकी वाहनातील 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


Post a Comment

 
Top