BY - युवा महाराष्ट्र
लाइव – सातारा |
गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर आणि परिसरात पावसाचे प्रमाण
समाधानकारक राहिल्याने सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव ओसंडून वाहू लागला
आहे. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी सातारा नगर पालिकेच्या वतीने या तलावाची ओटी भरून
विधिवत पूजा करण्यात आली. या कास तलावाची उंची वाढवण्याचे काम देखील सध्या प्रगतीपथावर आहे.
याबद्दल बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या हटके शैलीत दिलेला शब्द कसा आपण
पूर्ण करतो हे कॉलर उडवत सांगितले. या पाण्याचा वापर वीज निर्मिती प्रोजेक्टसाठी देखील
केला जाणार आहे तसेच उदयनराजेंनी एकदा कॅमेनमेंट दिली की उपरवाला च काय नीचेवाला भी
अपनीचं सुनता हैं अस कॉलर उडवत सांगितले.
Post a Comment