0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केलंय. गेल्या काही दिवसातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय, असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलंय. ईव्हीएमच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात सध्या देशभरातील विरोधकांनी एकत्र आणत असलेल्या राज ठाकरेंनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला.मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला आता केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलं. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरचं विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं.

Post a Comment

 
Top