0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइवठाणे |

मुंबईसह उपनगरांमध्ये पावासाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबईने पावसाळ्याच्या दोन महिन्यांमध्ये 200 सेंटीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. हा पावसाचा जोर अजूनच वाढणार असल्याची शक्यता आहे. जीएफएस मॉडेलनुसार येत्या आठवडाभर मुंबईत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. शनिवारी काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस असणार आहे. ठाण्यात तर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर येथे रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी एखाद-दुसऱ्या ठिकाणी अति तीव्र मुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळ पासुनच ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येथील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. तर ठाण्यातील डॉ.आंबेडकरकर रोड या महत्त्वाच्या मार्गावरील नाला तुडुंब भरला आहे. 

Post a comment

 
Top