0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - श्रीनगर/नवी दिल्ली |

काश्मीरमध्ये सध्या वेगवान हालचाली सुरू आहेत. अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर येथे राजकीय उलथापालथी घडत आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासोबतच प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसंच राज्यातील सर्व इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. जम्मूमध्येही सकाळी सहा वाजल्यापासून कलम 144 लागू झाले आहे. काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना आजपासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. श्रीनगरमधील सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.

Post a Comment

 
Top