BY
- युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
आज सकाळपासून मात्र मध्य रेल्वे सुरळीत सुरु झालेली दिसत आहे. रेल्वेच्या
तिन्ही मार्गावरील रेल्वे सध्या धीम्या गतीने धावत आहेत. मध्य रेल्वेकडून सकाळी
6.55 च्या सुमारास पहिली लोकल सीएसएमटी ते कसारा या मार्गासाठी सोडण्यात आली आहे. यानंतर कल्याण ते टिटवाळा,
टिटवाळा ते कल्याण आणि आसनगाव ते सीएसएमटी लोकल सुरु करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेकडून
कल्याण ते कर्जत आणि टिटवाळा ते कसारा वगळता मध्य रेल्वेची वाहतूक सुरुळीत सुरु आहे.
तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरु आहे. त्यामुळे आज (5 ऑगस्ट) चाकरमन्यांचे
हाल होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हार्बर मार्गावरही सीएसएमटी ते पनवेल तसेच
सीएसएमटी ते गोरेगाव लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.
Post a Comment