0
BY - सिकंदर नदाफ,युवा महाराष्ट्र लाइव – सोलापुर |
जम्मू काश्मीर येथील कलम 370 रद्द करण्यात आल्याने सोलापुरात शिवसेनेच्या वतीने जल्लोष करून मिठाई वाटण्यात आलीय. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 व 35 अ  हटवण्याचे काम भाजप सरकारने केल्याने सोलापुरातील नवी पेठेत शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
यावेळी पाकिस्तान सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण,महेश धाराशिवकर,संकेत पिसे,विजय पुकाळे,तुकाराम मस्के आणि येलुरेसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

 
Top