0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |
29 जुलैला मुख्यमंत्री मुरबाडला येण्याआगोदर 24 तासापुर्वी मुसळधार पावसाने रायता नदीवरील पुलाच्या पुढच्या भागाला भगदाड पडले होते टिटवाळा पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोठा आपघाती अनर्थ टळाला याचं पुलाला पुन्हा त्याच जागी प्रचंड भगदाड पडल्याने प्रवाशी वाहानचालक धास्तवले आहेत.
मुख्यमंत्री येणार म्हणुन त्यावेळी दोन तासात दगडाचा भराव करून सारवासारव केलेला रस्ता पुन्हा 4 ऑगस्टच्या पुरहाणीत वाहुन जावुन रायता पुलाच्या पुढील भागाला भला मोठा खोल खडडा पडला त्याचा भराव करून नॅशनल हायवेचे अधिकारी यांची धडपड सुरू होती परंन्तु रायता पुलाची बांधकाम मुदत संपली असल्याने रायता पुलावर महाड सारखी दुर्घटना होण्याचा संभव असल्याने प्रवासी वाहान चालक नागरिक भयभित झाले आहेत.रायता नदी बाराही महिने प्रवाहाने वाहाते सध्या बारवीडॅमची उंची वाढवल्याने मुसळधार पाऊस पडल्यास रायता पुल पाण्याखाली जाणार सतत पाण्याचा प्रवाह लागून पुलाच्या दोन्ही बाजुचा ठिसाळ भाग केव्हाही कोसळू शकते त्याचप्रमाणे इंग्रजानी बांधलेला रायता पुल धोकादायक असल्याचे जाहिर केलं असताना 
त्याच जुन्यापुलावर नॅशनल हायवेच्या अधिकार्‍यांनी  डागडूजी करून त्यावरच रून्दीकरण केले त्यामुळेच रायता पुलाला  धोकादायक स्थिती निर्माण झाली अशा बेजबाबदारी अधिकार्‍यावर कारवार्इ केली पाहिजे.रायता नविन पुल बांधण्यासाठी प्रयत्न करायाला हवे असताना अशी बाब लोकापासून दिशाहिन केल्याचा आरोप प्रवाशी नागरिक करत आहेत.शासनाने समृध्दी महामार्ग जेवढया जलदगतीने तयार केला त्याच धर्तीवर कल्याण मुरबाड नगर नॅशनल हायवे करणे गरजेचे आहे.मुरबाड वरून कल्याण ठाणे मुंबर्इकडे जाणारे एकमेव रस्त्यावरील रायता पुल आहे.त्याच पुलाच्या पुढे कांबा वरप पांजरपोळ येथे पाणी साचते परिणामी वाहतुक बंद होते याकडे शासनाने लक्ष वेधणे गरजेचे आहे.

Post a Comment

 
Top