0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
एरवी पक्ष सत्ता खुर्ची गुर्मी गरमी या कळपात वावरणारे मुरलेल्या भाकरीचे पडलेले चेहरे व्यासपिठावर लोकाना दिसतात.तेव्हा खरं राजकीय बोडवा आल्या सारखं वाटतयं…!
राजकीय जीवनात निवडणुकीतच नेते कार्यकर्ते का एकजुटीने उत्साहीत असतात याकडे मतदार राजा  आहे.त्यांच्या सोबतीला जोडलेला ठेकेदार रेतीचोर अवैधधंदेवाले यातुन मते मिळत नाहीत मात्र एक उत्तर देखांवा दाखवण्याचे काम या सिझनमध्ये होतंय.एरवी गांवागांवात शहरात प्रचंड आरोग्याची साथ पाणी टंचार्इ शालेय ऑडमिशनचा प्रश्‍न सामान्याच्या विविध समस्याकडे दुर्लक्षीत झालेले राजकारणी निवडणुकीत युती अगाडयानी एका व्यासपिठावर येतात म्हणतात यानांच निवडुण दया मग निवडणुका संपल्यावर त्यांच्याकडे  बोट दाखवुन त्यांनी काय केले कसे विचारतात हयाचे उत्तर मतदार आता योग्य उमेदवाराना मतदान देवुन करतोय त्यातच नापसंतीला अधिक महत्व दिले जातंय.कार्यकर्ता वापरून घेवुन फेकून देण्याचं काम राजकारणात मोठया प्रमाणात चाललं आहे.मात्र राजकारणातील मैत्री जोपासण्याचं काम सुध्दा अनेक जण  निवडणुकीत करतात हाच बोडवा जवळ आला आहे.उदया काय घडेल याचा  नाही त्यातुन निर्माण झालेली मानसिकतेची मुरलेली भाकरीचे चेहरे व्यासपिठावर पडलेले दिसतात.पैशानी निवडणुका जिंकता येतात म्हणुन लोकाना हात जोडुन पाच वर्षानी पाया पडून वेळ मारून नेलेले पुन्हा मतदार कार्यकर्त्याच्या आंगणात येत नाहीत तुम्ही फुकट मते दिली का असा सवाल केला जातो त्याला बदलता काळ उत्तर देण्यासाठी सज्ज आणि गप्प आहे  येत्या निवडणुकीत दिसत आहे.काहीतर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रचारात दिसला की घातला हार ओढला इकडे बसवला खाली कशासाठी हट्टहासं तुम्हाला नक्की काय हवे विरोध नको का ? की दबावतंत्रासाठी हा: हाः पहा सगळे माझ्याकडे त्यांच्या कडे कोणी नाही अशा बदलत्या राजकारणात बदल होणे गरजेचे आहे.काहीना धुळ चारली तेही त्याचांच उदोउदो  मग सारे मिळुन जनतेच्या समस्या सोडवा लोक तुमच्या बरोबर सदैव राहातील परंन्तु त्यांना हुशारीचं बळ नको आहे.आपल्यापेक्षा हुशार आणि सामान्याची सेवा करणारा आपल्याकडे आकर्षित झाल्यास नकार देतात.येत्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकजण दिलजमार्इकडे पहातात मात्र ज्यांच्यासाठी आमचं वैर निर्माण झालं त्यांनी काय करावं असा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडलेला पाहाण्यास दिसत आहे.

Post a comment

 
Top