BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या व ऐतिहासिक हरीचंद्रगडाच्या अगदी नजीक वसलेल्या आदिवासी बांधवांच्या व तालुक्याचे
शेवटचे टोक असलेल्या वालिवरे गावातील लोकांना सध्या अनेक समस्याना सामोरे जावे लागत
आहे. गेली अनेक
वर्षे हे गाव विकासापासून वंचित आहे. गावातील अनेक तरुणांना बेरोजगारीचे
जीवन जगावे लागते आहे ,उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते .तसेच या गावाला जाण्यासाठी ज्या
रस्त्याने जावे लागते त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे .जवळ- जवळ १४० ते १५० घरे
असलेल्या या गावाची लोकसंख्या ११५० ते १२०० आहे. केलेवाडी, कुंभाले,कोंभालपाडा व वालिवरे
या चार गावांचे वालिव्हरे हे ग्रामपंचतीचे मुख्य केंद्र आहे. गेली अनेक वर्षे या गावात
अंतर्गत रस्ता नाही ,त्यामुळे गावातून वाहन चालविणे जिकरीचे असते ,तसेच न्याहाडी ते
वालिवरे हा ९ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब
झाला असून या रस्त्यातून वाहने चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे गावातील
रुग्णांना टोकावडे किंवा मुरबाड येथे नेण्यासाठी आकाश - पाताळ एक करावे लागते
.आजूबाजूच्या गावांतील लोक रस्ता खराब असल्याने या गावाला जाणे टाळतात. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे .
Post a comment