BY - गौरव
शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
देशात आणि महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना बांधित रूग्ण
आढळतात त्यावर उपयोजना म्हणुन राज्य सरकार तसेच ठाणे जिल्हाधिकारी यंत्रणा कार्यविनित
आहे.रूग्णांची तपासणी नागरिकाना जिवनास्तुक वस्तुचा पुरवठा संचारबंदी फवारणी असे विविध
उपक्रम राबवत असताना त्यांची माहिती मुरबाड तहसिलदार,मुरबाड पोलिस ठाणे,मुरबाड आरोग्य
विभाग,मुरबाड नगरपंचायत यांच्याकडुन अधिकृत जनसंपर्क कार्यालयातुन मिडीयाला मिळत नसल्याने
अनेक समस्या घडामोडी दडपल्या जात असुन शासनाने रोजच अधिकृत माहिती मिडीयाला अधिकृत
स्थळा वरून प्राप्त करून दयावी अशी मांगणी केंन्द्रीय पत्रकार संघटनेचे ठाणे जिल्हा
अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.मुरबाड तालुक्यात संपुर्ण ग्रामीण भाग शेती भाजीपाला
तसेच छोटया व्यवसायावर उपजिवीका करतात मुरबाड तालुक्यात एकही कोरोना रूग्ण नाही तसेच
काही परदेशातुन आलेले संशयीत रूग्ण होमव्कारंटार्इन केल्याचे सांगण्यात येते परंन्तु
गेल्या चार पाच दिवसात एका नेरळमध्ये प्राथमिक आरोग्य केंन्द्रात काम करणार्या डॉक्टरानी
कोरोना संशयित रूग्ण आहे असे सांगितल्याने मुरबाड शहरातील सर्व गल्लीबोल सिमा बंद करून
मुरबाड मध्ये हाःहा कार माजवला होता.सदर वैद्यकीय अधिकार्यांची चौकशी मुरबाड आरोग्य
अधिकारी डॉ.बनसोडे यांनी तसेच तहसिल पोलिस यंत्रणेने केल्याचे समजते परिणामी नेरळचा
डॉक्टर कोरोना निगेटिव्ह असल्याचे समोर आल्याने त्या डॉक्टराचा बनाव होता काय? त्याच्यामुळे
आम्हा जनतेला नाहक त्रास झाल्याच्या संप्तत प्रतिक्रिया नेरळ ग्रामीण भागात तसेच मुरबाड
मध्ये उमटल्या असुन त्यांच्या संबधी सत्य माहिती प्रेसनोट आरोग्य अधिकार्यांनी मिडीयाला
दयावी आणि लोकाच्या मनातील भिती दुर करावी अशी मांगणी होत आहे.मुरबाड शहरात किती रूग्णांची
तपासणी झाली किती रूग्ण होमव्कारंटार्इन आहेत.किती पॉजिटिव्ह निगेटिव्ह रिर्पोट आले
ज्या लोकाना होमव्कॉरंटार्इन करण्यात आले आहेत त्यांना दुध भाजीपाला मेडीकल किराणा
जिवानास्तुक वस्तुचा पुरवठा नगरपंचायत करते किंवा महसुल विभाग यांची माहिती मिडीयाला
अधिकृत दिल्यास आफवा पसरवण्यासारखे मॅसेज फॉरर्वड होणार नाहीत याकडे लक्ष वेधावे.गांव
शहरातील रस्ते सिमा बंद केल्या आहेत.त्यांच्यातुन गांवा गांवात माणसा माणसात तेट निर्माण
होणार नाही याची दक्षता घेवुन मुरबाड मध्ये बोकड मेंढा कोंबडयाची कत्तल घरातच होते
काय त्यांच्या मटणाची विक्री 270 रूपय चिकन 750 रूपय बोकडयाचे मतन विक्री केली जाते.याकडे
लक्ष वेधावे कारवार्इ व्हावी नगरपंचायतीने चिकन मटणाची अधिकृत दुकानदाराना सकाळी 7
ते 11 वेळात परवानगी दयावी अशा मागण्या नामदेव शेलार यांनी केल्या आहेत.
Post a comment