0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत (Guided Heritage Walk) बृहन्मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. पर्यटन मंत्री आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात झाला.महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, महापालिका आयुक्त श्री. आय. एस. चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

 
Top