0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या अनुसंधान केंद्राचा विस्तार देशातील अग्रगण्य वैद्यकीय रुग्णालयाच्या धर्तीवर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुढाकार घेणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये 971 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय व नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार संस्था सुरु करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने सादर करावा, असे निर्देश देऊन प्रस्तावित पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यास तत्वत: मान्यता देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राबाबतची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत, आमदार कुणाल पाटील, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी डॉ. रविंद्र ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष शीतल उगले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ.तात्याराव लहाने आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top