0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

राज्यात बायोडिझेलच्या नावाखाली होणारी भेसळयुक्त इंधनाची विक्री तातडीने रोखण्यात यावी. यामुळे प्रदुषण तर वाढत आहेच परंतु, त्याचबरोबर वस्तु व सेवा करही मोठ्या प्रमाणात बुडविला जात आहे. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.यासंदर्भात भेसळयुक्त इंधनाच्या संदर्भात विधानभवन, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीस पोलीस महासंचालक एस.के. जायसवाल,  डॉ. राजेंद्र सिंघल, सहसचिव एम.एम. सूर्यवंशी, नागपुर उपायुक्त (पुरवठा) आर.के. आडे, उप नियंत्रक (वजनमापे) शिवाजी काकडे, रिटेल सेल्सचे महाप्रबंधक (इंडियन ऑईल) ए.के. श्रीवास्तव, महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख उपस्थित होते.

Post a comment

 
Top