0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

महान शास्त्रज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. कलाम यांची (शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर) जयंती आहे. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर (दि.१५) पासून राज्यातील विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडीत संशोधन संस्थांतील प्रयोगशाळा आणि सर्व प्रकारची ग्रंथालये खुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे.‘मिशन-बिगीन-अगेन’च्या अनुषंगाने निर्गमित निर्देशांमध्ये ग्रंथालये आणि संशोधन प्रयोगशाळा खुल्या करण्याबाबत नियमही नमूद करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड-१९ च्या आरोग्य दक्षतेच्या सर्व नियमांचे पालन करून या दोन्ही ठिकाणी नेहमीचे कामकाज करता येणार असल्याचे म्हटले आहे.

Post a comment

 
Top