0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

कोरोनाने जगभर थैमान घातले असताना भारतात कोरोनाचा मृत्युदर सर्वात कमी होता तसेच रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक होता. याचे श्रेय आपल्या देशातील सेवाभावी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्ती तसेच निःस्वार्थ सेवा करणाऱ्या कोरोना देवदूतांना जाते असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. देश महामारीच्या विळख्यात असताना समाजातील दानशूर व्यक्तींनी करुणा जागाविल्यास आपण कोरोनाला पराभूत करू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.दैनिक शिवनेर तर्फे बुधवारी राजभवन येथे आयोजित ‘सन्मान कोरोना देवदुतांचा’ या कार्यक्रमात निवडक समाजसेवींना कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

Post a comment

 
Top
satta king