0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून  सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) किमान ५० टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) देणे आवश्यक होते. आता  खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत. तर राखीव गटांसाठी ४० टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत.

Post a comment

 
Top
satta king