BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या
वीज वाहिन्यांत बिघाड झाल्यामुळे सकाळी 10 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला.
तथापि, युद्धपातळीवर तीन साडेतीन तासातच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच
यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत दिले. या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन
राऊत यांनी वस्तुस्थिती सादर केली त्याचप्रमाणे रुग्णालये आणि रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने
सुरळीत करण्यात आला अशी माहिती ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी
दिली.
Post a comment