BY - कुणाल शेलार,युवा
महाराष्ट्र लाइव- मुरबाड |
मुरबाड तहसिलदार कार्यालयात
विविध समस्या नागरिकांच्या येत असतात त्यामध्ये भुखंड असो,जमिनीची प्रकरणे असो,न्यायालयीन
बाब असो किंवा विविध दाखल्यांचा विषय असो या सर्व विषयाकडे प्रशासक अधिकारी आलेल्या
तक्रारीवर लक्ष न घालता चौकशी आलेल्या तक्रारीला निकाली काढण्याच्या प्रयत्नात असतो.सामान्यांची
कामे जलदगतीने होतांना दिसत नाहीत,लॉकडाऊनमुळे रोजंदारी साधन गेले त्यात विविध कामकाजासाठी
उत्पन्न दाखले हवे असते त्यामध्ये तुटी काढल्या जातात,घरातील माणसे मोजली जाते परंतू
त्या घरात उपासमारीची वेळ येते तेव्हा हाच प्रशासक फिरलाही नव्हता अशा अनेक समस्या
आज मुरबाड कार्यालयात प्रलंबित असताना मन्नुभार्इच्या वॉर्इन शॉपच्या तक्रारीवर कोनतीही
कारवार्इ अद्दयाप केली गेली नाही.निवासी नायब तहसिलदार यांच्या मनमानीने नागरिक हतबल
झाले आहेत.कोणतेही शेतकरी वर्गाचे काम असो त्यामध्ये शासनाची अट काढून कामे मार्गी
लावीत नाहीत.एखाद्दयाचे उत्पन्नच शेती कसुन घरासाठी भात काढणारा असेल तर तो काय दाखवेल
असा प्रकारही मुरबाड तहसिलदार कार्यालयात घडला आहे.त्यात मुरबाड भारत वॉर्इनशॉपला मुरबाड
प्रशासक पाठिंबा देत आला असून आजपर्यंत कारवार्इ ही शुन्यच राहिली आहे.
अनेक जणांशी निवासी नायब तहसिलदार यांचे
वादावाद होतात परंतू कामे मार्गी लावण्यासाठी कधी अधिकारी वर्गाची धरपकड होत नाहीत.मन्नुभार्इ
विरूध्द मागेही उपोषणे करण्याची मोहीम होती तेव्हा मुरबाड तहसिलदार यांनीच उपोषण मागे
घेण्यासाठी पत्रव्यवहार तक्रारदाराला केला होता मग आज का त्याच मन्नुभार्इला पाठिशी
घातले जाते ? का कोणती कारवार्इ केली जात नाही असा सवाल केला जातो.त्यामुळे जिल्हाधिकारी
ठाणे यांनी प्रथम मुरबाड निवासी नायब तहसिलदार यांची चौकशी व्हावी आणि तद्नंतर भारत
वॉर्इन शॉप व शेतकरी वर्गातील सर्वसामान्यांच्या तक्रारीचे निराकरण व्हावे यासाठी पत्रव्यवहार
केला गेला आहे.सदर विषयाची 7 दिवसात कोणतीही दखल घेतली नाही तर उपोषणे,आंदोलने,मोर्चा
केला जार्इल असा इशाराही तक्रारदारानी दिला आहे.
Post a comment