0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

देशात आणि राज्यात कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे दि.१५ ऑक्टोबर रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरला कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी न करता आपापल्या विभागात कोरोनाबाबत आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम तसेच जनजागृतीपर उपक्रम राबवावे असे आवाहन मंत्री श्री. भुजबळ यांनी केले आहे.

Post a comment

 
Top