web-ads-yml-728x90

Breaking News

माहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत विविध ठिकाणी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नि:स्वार्थपणे जनतेच्या सुरक्षिततेसाठी कायम सज्ज असलेल्या पोलीस दलाला आणि त्यांच्या कुटुंबियांना लसीचे संरक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून आज माहीम पोलीस वसाहतीत आयोजित शिबिरास मंत्री श्री. ठाकरे यांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आमदार सदा सरवणकर, नगरसेवक मिलिंद वैद्य, श्रीमती श्रद्धा जाधव, अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.माहीम पोलीस वसाहतीतील समाज मंदिर सभागृहात सुराणा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या शिबिरात पोलिसांच्या सुमारे 500 कुटुंबियांना लस दिली जात आहे.

No comments

satta king