web-ads-yml-728x90

Breaking News

दीपिका आणि प्रवीणकडून भारताला पदक मिळण्याच्या आशा पल्लवित, तिरंदाजी मिक्स्ड टीमच्या उपांत्यपूर्व फेरीत भारत

 


जपानच्या टोक्यो शहरात सुरु असलेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये जगात नंबर एकला असणारी भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारीने (Deepika Kumari) मराठमोळ्या प्रवीण जाधवसोबत (Pravin Jadhav) मिळून तिरंदाजी स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याच्या आशा आणखी पल्ल्वीत केल्या आहेत. दोघांनी मिक्स्ड टीम इव्हेंटच्या राउंड ऑफ 16 मध्ये यश मिळवत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे आधी स्पर्धेत पिछाडीवर असताना दोघांनी बाउन्स बॅक करत हे यश मिळवलं आहे.8 सेटच्या सामन्यात चीनी ताइपेची जोडी भारतीय जोडीवर 3-1 ने पुढे होती. पण त्यानंतर दीपिका आणि प्रवीणने कमबॅक करत विजय मिळवला. दोघांनी प्रतिस्पर्ध्यांना एकही सेट जिंकू दिला नाही. संपूर्ण सामन्यावर स्वत:चे वर्चस्व प्रस्थिपित करत सामना 5-3 च्या फरकाने आपल्या नावे केला.

No comments