web-ads-yml-728x90

Breaking News

शिर्षक - आषाढघन
मेघश्याम आषाढ

कसा ओथंबून आला
चैत्र-वैशाख वणवा
गारव्याने संपवला||१||

आषाढघन भरून आले
वर्षाव पावसाचा
धुवांधार जलधारा
धाक कडाडल्या बिजलीचा||२||

कुंद वातावरण सारे
ढगाळलेले आकाश
मन हुरळूनी जाते
आल्हाददायक प्रकाश||३||

आनंदित मानवजात
पशुपक्षी चराचर
सुखावली धरणीकाया
थेंब झेलती सागर||४||

नद्याही आनंदल्या
वृक्षवेलीही हसल्या
बहरली सृष्टी सारी
दिशा सप्तरंगांनी सजल्या||५||

मन भिजते पावसात
आषाढघन वेड लावी
मनमोराचे पिसारे
हर्षोल्हासाने फुलवी ||६||

सौ. तृप्ती विजय पाटील
उल्हासनगर
मो. नं. 9156597013

No comments